नदीच्या दोन्ही बाजूस कायमस्वरूपी संरक्षित कॅनल पद्धतीचा स्लोप भिंत बांधण्याची मागणी
उस्मानाबाद – शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधून वाहणारी भोगावती नदी स्वच्छ करून नदीच्या दोन्ही बाजूस कायम स्वरुपी संरक्षित कॅनाॅल पध्दतीचा स्लोप भिंती बांधण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्री यांना काॅग्रेस विधी मानवाधिकार यांच्या वतीने निवेदन दिले आहे
शहरातून वाहणारी भोगावाती नदी ही नगर परिषद उस्मानाबाद यांनी नव्याने घोषित केलेल्या प्रभाग क्रमांक
१,४,५,९,१३,१५,१६ या प्रभागातून वाहते. प्रभाग क्रमांक ९ मधून प्रभाग क्रमांक १३ मध्ये वाहत येत असताना अत्यंत घाण व दुर्गंधी सह वाहत येते प्रभाग क्रमांक १३ मधून दुर्गंधीयुक्त घाणीने भरलेली रोगराई व असणारी व डुक्कर आणि कुत्रे यांचे सुळसुळाट असलेली घाण पाण्याच्या नालीसारखी वाहते पुढे आणखीन घाण होऊन प्रभाग क्रमांक १६ व प्रभाग क्रमांक १५ मध्ये वाहत जाते या नदीत गावातील घाण येऊन मिळते यामुळे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होत आहे आणि दुर्गंधीमुळे वायू प्रदूषित होत आहे
वरील प्रभागातील नागरिकांना भोगावती नदीवरील डासांमुळे डेंग्यू मलेरिया सारखे रोग होत आहेत तसेच प्रदूषित व घाण वासामुळे लोकांना श्वासोच्छ्वासचे विकार होत आहेत त्यामुळे प्रभाग १३ मधील व सभोवतालच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आणि आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत यामुळे लोकांचे आयुष्यमान कमी होत आहे प्रभाग १३ मधील भोगावती नदीच्या दोन्ही बाजूला शहारातील मोठ्या मोठ्या लोकवस्त्या आहेत शहरातील मूळ बाजार पेठ भाजी मंडई ही या प्रभागात आहे भोगावती नदीच्या घाणी मुळे जल प्रदूषणामुळे व वायू प्रदूषण यामुळे या भागातील लोकांना त्रास होत आहे व लोकांचे आरोग्य बिघडत आहे आणि रोगराई पसरत आहे
यामुळे उस्मानाबादच्या लोकांच्या संवैधानिक व मूलभूत हक्काचे आणि मानवी अधिकाराचे उल्लंघन होत आहे. अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक १३,१५,१६ मधील वाहणाऱ्या भोगावती नदीच्या स्वच्छतेबाबत नगर परिषदेने कोणतीही योग्य ती तरतूद व कार्यवाही केली नसल्याचे दिसून येते व नगरपरिषद लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते असे जाणवते तरी शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीची विशेषता प्रभाग क्रमांक 13 मधुन वाहणाऱ्या भोगावती नदी ची पूर्णपणे स्वच्छता तात्काळ करण्यात यावी तसेच भोगावती नदीच्या दोन्ही बाजूस कायमस्वरूपी संरक्षित कॅनल पद्धतीचा स्लोप भिंत बांधण्यात यावी तसेच नदीमध्ये वाहत येणाऱ्या किंवा शहरातून नदीत सोडल्या जाणाऱ्या घाणीची पर्यायी सुविधा करावी व दोन्ही संरक्षण भिंतीच्या बाहेरच्या बाजूला गांवाहून येणारा बंदिस्त नाल्याच्या बांधण्यात यावे व कायमस्वरूपी स्वच्छतेची व्यवस्था करण्यात यावी या निवेदनावर ॲड. विश्वजीत शिंदे, शैलेश देव, अग्निवेश शिंदे ,ॲड. जावेद काझी, प्रभाकर लोंढे ,अशोक बनसोडे अभिमान पेठे, डॉ.लतिफ सय्यद, पवनराजे पांचाळ, रिजवान सय्यद रत्नदीप सोनवणे, सिद्धाराम मुळे तसेच या भागातील दिड हजार लोकांनी स्वाक्षऱ्या आहेत.