पाथरुड – (प्रतिनिधी)
जि.प प्राथमीक शाळा वडाचीवाडी तालुका भूम या शाळेने आषाढी एकादशीचे औचित्य साधून ज्ञानसागर पायी प्रवास दिंडी गावातून काढली. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ टाळकरी वारकरी गावातील महिला यांनी सहभाग घेतला. गावात अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले होते. दिंडीतील वारकऱ्यांसाठी फराळाची सोय करण्यात आली होती. तसेच दिंडीत सहभागी गावचे सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व सदस्य तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, सर्व टाळकरी, भजनी मंडळ,सर्व महिला मंडळ शाळेचे मुख्याध्यापक श्री झणझणे सर व सहशिक्षक गिरी आणि गावचे सर्व ग्रामस्थ पुरुष महिला आदींची उपस्थिती होती. दिंडीच्या समारोपप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक झणझणे सर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमचे पंढरपूर आहे व सर्व गावकऱ्यांसाठी सुखाचे दिवस येऊ दे इडा पिडा दूर होऊ दे असे साकडे विठ्ठलाकडे घातले व दिंडीची सांगता करण्यात आली…