किरण बकालेंच्या विरोधात जोरदार निदर्शने, मोर्चा काढून निषेध

0
58

 

उस्मानाबाद –

जळगाव येथील  पोलीस निरीक्षक किरण बकाले याने मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह विधान केल्याबद्दल शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पोलिस निरीक्षक किरण बकाले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून मोर्चा काढत   विरोधात घोषणाबाजी केली.

 जळगाव जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांना शासकीय सेवेतून,पोलीस खात्यातून कायमचे बडतर्फ करून, गुन्हा दाखल करून, अटक करून, महाराष्ट्रातून हद्दपार करण्याबाबत शिवराज्याभिषेक सोहळा समिती च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा येथील जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी एका पोलीस कर्मचाऱ्या बरोबर मोबाईलवर बोलत असताना मराठा समाजाबद्दल अत्यंत खालच्या पातळीतील हिण,अपमानस्पद, लज्जास्पद, शर्मेने मान खाली घालण्यासारखे बोलून समस्त मराठा समाजाचा व संपूर्ण महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा अपमान केलेला आहे. पोलीस खात्यासारख्या शिस्तबद्ध खात्यात राहून जात धर्माबद्दल मनात आकस ठेवून वैरभाव, आकस निर्माण करण्याच्या उद्देशाने एका विशिष्ट जात समुदायाचा अपमान करण्याच्या उद्देशाने या पोलीस अधिकाऱ्याने हे वर्तन देशासाठी अशोभनीय आहे. किरण बकाले सारखे अधिकारी जर पोलीस खात्यात राहिले तर समाजात अशांतता निर्माण होऊन समाजात जातीय अशांतता निर्माण होऊ शकते. तरी पोलीस निरीक्षक किरण बकाले व संबंधित पोलीस कर्मचारी याच्यावर महाराष्ट्र शासनाने व पोलीस प्रशासनाने बडतर्फीची कारवाई करावी.तसेच त्यांच्या गुन्हा दाखल करून त्याला अटक करून सदर अधिकाऱ्याला महाराष्ट्रातून हडपार करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर शिवराज्याभिषेक सोहळा समिती अध्यक्ष शशिकांत खुने, धर्मराज सूर्यवंशी, दत्तात्रय साळुंखे, रवी मुंडे, सदानंद दहीहटणीकर, कंचेश्वर डोंगरे, निशिकांत खोतरे, अमोल पवार, अच्युत थोरात, एडवोकेट प्रशांत, जगदाळे सुनील मिसाळ विकास जाधव गणेश नलवडे आनंद जाधव रियाज शेख धनंजय साळुंखे अशोक गुरव संतोष घोरपडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here