उस्मानाबाद – कोव्हिड च्या BF-7 व्हेरिएन्ट अनुषंगाने तुळजाभवानी मंदिरासाठी प्रशासनाने
सर्व भाविक भक्त, महंत, पुजारी यांच्यासाठी सूचना निर्गमित करू आवाहन केले असून त्यात म्हटले आहे की, Indian Medical Association (IMA), नवी दिल्ली यांची दिनांक 22/12/2022 रोजी प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये संपुर्ण देशामध्ये कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएन्ट BF-7 संक्रमित झाला असल्याने नागरीकांनी याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
श्री तुळजाभवानी मंदिरात येणारे सर्व भाविक भक्त, महंत, पुजारी बांधव व कर्मचारी यांनी कोरोना विषाणूंचा प्रदुर्भाव रोखणेसाठी खाली नमुद सुचनांचे तंतोतंत पालन करावे.
1) मंदिर व मंदिर परिसरात व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरण्यात यावेत.
2) सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात यावे. 3) आपले हात नियमित साबनाने अथवा सॅनिटयझरने स्वच्छ ठेवण्यात यावेत.
4) अंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा.
5) जर आपणास ताप, खोकला, सर्दी, संडास, उल्टी, डोकेदुखी व सांधेदुखी या आजारांचा त्रास होत असल्यास तात्काळ नजीकच्या दावाखन्यास भेट देऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
6) शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.