उस्मानाबाद दि.६ (प्रतिनिधी) – सामान्य जनतेचा पैसा लाइफ इन्शुरन्स ऑफ इंडिया अर्थात एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या आस्थेने, आशेने व विश्वासाने ठेवलेला आहे. यातीलच गुंतवणूक आदाने उद्योग समूहात करण्यात आलेली आहे. तर अदानी उद्योग समूहाने मोठा घोटाळा केला असल्यामुळे एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियामधील ठेवीदारांच्या रकमेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाला संरक्षण द्यावे, या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियासमोर दि.६ फेब्रुवारी रोजी जोरदार आंदोलन करीत निदर्शने करण्यात आली.
भारतीय जीवन विमा कंपनी व भारतीय स्टेट बँकेमध्ये सर्वसामान्यांच्या ठेवी ठेवण्यात आलेल्या आहेत. या पैशाची गुंतवणूक अदानीच्या उद्योग समूहात केली आहे. तर अदानीच्या विविध उद्योग समुहात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा केल्याची पोलखोल हिंडेनबर्ग या वित्तीय संस्थेने करुन जगासमोर आणला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी केलेली गुंतवणूक धोक्यात येण्याची शक्यता आहे या सामान्य लोकांच्या गुंतवणुकीला भारत सरकारने संरक्षण द्यावे व एलआयसी आणि सामान्य गुंतवणूकदारांना नुकसान पोहोचू नये याची काळजी घेण्यासाठी उचित कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोदी हटाव, देश बचाओ, एलआयसी बचाओ.. देश बचाओ, एसबीआय बचाओ.. देश बचाओ, अदिनीच्या उद्योग समूहाची चौकशी झालीच पाहिजे, अदानीला पाठीशी घालणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो अशा प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड धिरज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा बँकेचे संचालक महेबूब पटेल, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अभिजीत चव्हाण, महिला विभागाच्या प्रदेश महासचिव शीला उंबरे, जिल्हा उपाध्यक्षा ज्योती सपाटे, कळंब तालुकाध्यक्षा अंजली ढवळे, उमेश राजेनिंबाळकर, सिद्धार्थ बनसोडे, मानवाधिकार विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, ॲड राज कुलकर्णी, भूषण देशमुख, ॲड जावेद काझी, ॲड दर्शन कोळगे सुरेंद्र पाटील अमोल कुतवळ, आश्रुबा माळी, सलमान शेख, अब्दुल लतीफ, अभिजीत देडे, राहुल लोखंडे, विश्वजीत शिंदे, बालाजी माने, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष आयुब पठाण, अनंतराव घोगरे, अशोक बनसोडे मुनीर शेख, गणेश सापते, प्रणित डिकले, मेहराज शेख, सरफराज काझी, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, विश्वंभर मैंदाड, संजय गजधने, अमोल पाटील संजय कवडे, हसन शेख, अब्दुल लतीफ आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.