कोल्हापूर,दि.१२ (अमोल कुरणे) गगनबावडा पोलीस स्टेशनचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी स्वीकारला असून, या पूर्वी रणजीत पाटील यांची ३० जानेवारी रोजी जयसिंगपूर येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते. यादरम्यान गगनबावडा पोलीस स्टेशन चा कार्यभार कळे पोलिस ठाण्याचे ए.पी.आय. प्रमोद सुर्वे यांच्याकडे देण्यात आला होता.पी.एस.आय.म्हणून भांडवलकर नक्षलवादी एरिया गडचिरोली येथे काम करत असताना ते ज्या वाहनातून जात होते, त्या वाहनाला नक्षलवाद्यांनी भू-सुरुंगाच्या स्फोटाने उध्वस्त केले होते, यामध्ये ते गंभीर जखमी होऊनही प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूच्या खाईतून वाचले आहेत. त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक मिळाले आहे. गांधीनगर येथेही त्यांनी काम पाहिले होते. त्यानंतर त्यांची बदली एसपी ऑफिस नियंत्रण कक्ष, कोल्हापूर जिल्हा न्यायालय येथे झाली होती. त्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी , सिंघम म्हणून ओळखले जाते.