धाराशिव – १ लाखाची लाच घेताना सरपंच पतीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून त्याबाबत अधिक माहिती अशी की,तक्रारदार हे मेनकर एनर्जी प्रा. लिमिटेड कंपनी मध्ये साईट सुपर वायझर म्हणून नेमणूकीस आहेत आणि कंपनीचे जल जीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेंवर आधारित दुहेरी पंप लघुनळ योजनेचे 18,00,000/- (अठरा लाख रुपये) किमतीचे काम रोहकल, ता. परांडा, ज़िल्हा धाराशिव येथील 3 वस्तीवर चालू असून यातील आरोपी हनुमंत पांडुरंग कोलते , वय 43 वर्षे, व्यवसाय शेती, सरपंचपती (खाजगी इसम ), रा. रोहाकल, ता. परांडा, ज़िल्हा धाराशिव यांनी सदर योजनेचे काम थांबवून ते पूर्ववत चालू करू देण्यासाठी यातील तक्रारदार यांना दिनांक 22/03/2023 रोजी चालू असलेल्या तीन्ही कामाचे प्रत्येकी 50,000/- रुपये प्रमाणे 1,50,000/- रुपये किंवा सोलरच्या तीन प्लेट व त्याचे साहित्य अश्या लाचेची मागणी पंचांसमक्ष करून तडजोडी अंती 1,00,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून आज दिनांक 23/03/2023 रोजी 1,00,000/- रुपये लाच रक्कम ज़िल्हा परिषद उपहार गृह धाराशिव येथे पंचांसमक्ष स्विकारल्याने आरोपी यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन आनंदनगर, धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
आणखी वाचा – अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीही जात प्रमाणपत्र पडताळणी अनिवार्य
शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेत हा झाला बदल