आ. राणाजगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
धाराशिव – मोदी @ ९ या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असून त्यांच्या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. यावेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष अजित गोपछे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड. मिलिंद पाटील उपस्थित होते
१६ जून रोजी सकाळी सोलापूर येथून तामलवाडी मार्गे त्यांचे जिल्ह्यात आगमन होईल.त्यानंतर पांगरदरवाडी येथे मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. तेथून ते श्री तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूर येथे येतील तिथेच मंदिर संस्थानच्या कार्यालयात विकास आराखड्याचे सादरीकरण केले जाईल. पुढे ते धाराशिव येथे येऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी करतील. त्यानंतर प्रबुद्ध नागरिक संवाद साधण्यासाठी ॲड. मिलिंद पाटील यांच्या निवासस्थानी भेट देतील तसेच स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात विवीध विभागांची आढावा बैठक घेऊन दुपारी ५.३० नंतर मल्टीपर्पज कॉलेजच्या मैदानावर विशाल सभेला ते संबोधन करणार आहेत.
दैनिक जनमत चा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन होण्यासाठी क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KImA2TNPjJvCQ8UvZ9DAym