तेरणा मध्यम प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी ३ कोटींची मान्यता

0
63

 

धाराशिव – तालुक्यातील उजव्या व डाव्या कालव्याच्या दुरूस्तीचे अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत रू. ३,४१,४६,१२६ /- (रू. तीन कोटी एकेचाळीस लक्ष शेहचाळीस हजार एकशे सव्वीस फक्त) एवढया खर्चाच्या प्रस्तावास खालील अटींच्या अधिन सोबतच्या प्रपत्रानुसार प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

तेरणा मध्यम प्रकल्प, तेरणा नदीवर सन १९६४ मध्ये बांधण्यात आलेला आहे. प्रकल्पास उजवा कालवा व डावा कालवा असून उजव्या कालव्याची लांबी १६ कि.मी. असून सिंचन क्षमता ९०२ हेक्टर आहे. तसेच डाव्या कालव्याची लांबी १५ कि.मी. असून सिंचन क्षमता ७५० हेक्टर आहे. अशाप्रकारे प्रकल्पाचे एकुण लाभक्षेत्र १६५२ हेक्टर आहे. माती धरणाची लांबी २४३७ मी. व जास्तीत जास्त उंची १५.२३ मी. आहे. सन २०११ मध्ये प्रकल्पाचे कालव्याव्दारे अंतिम सिंचन करण्यात आलेले आहे. त्यानंतर तेरणा मध्यम प्रकल्प बंद पाईपलाईन व्दारे सिंचन करण्याच्या दृष्टीने पथदर्शी प्रकल्प म्हणून सन २०१२ मध्ये हाती घेण्यात आला आहे. तथापी बंद पाईपलाईन वितरणप्रणाली सद्य:स्थितीत काही तांत्रिक अडचणी मुळे बंद आहे व त्यामुळे उजव्या व डाव्या कालव्याव्दारे होणारे सिंचन बंद झालेले आहे. बंद पाईपलाईन वितरणप्रणालीव्दारे सिंचन करण्यास विलंब होत असल्याने व धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून देखील कालव्याव्दारे अथवा बंद पाईपलाईन वितरण प्रणालीव्दारे पाणी देणे शक्य होत नसल्याने कालव्याची दुरूस्ती करण्याची मागणी लाभधारका कडून वारंवार होत आहे. सदरील कामे पूर्ण झाल्यावर उपलब्ध पाणीसाठयाव्दारे १६५२ हेक्टर सिंचन करणे शक्य होणार आहे.


दैनिक जनमत चा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन होण्यासाठी क्लिक करा 

https://chat.whatsapp.com/KImA2TNPjJvCQ8UvZ9DAym

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here