धाराशिव – 30 नोव्हेंबर 2023 रोजी धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाजाचा मोर्चा धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र वाटप करावेत या एकमेव मागणीसाठी काढण्यात येणार आहे, भारतीय राज्यघटनेत आरक्षण असताना सुद्धा केंद्र शासनाने व राज्य शासनाने धनगर समाजाला उपेक्षित ठेवले आसून राज्यघटनेत दिलेल्या आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज झाला आहे. त्या अनुषंगाने मोर्चा 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10:00वाजता लेडीज क्लब पासून सुरू होऊन श्री संत गाडगेबाबा चौक -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक -छत्रपती शिवाजी महाराज चौक -लहुजी वस्ताद साळवे चौक ते जिल्हाअधिकारी कार्यालय धाराशिव येथे जाणार आहे आणि त्या ठिकाणी धनगर समाजातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या वारसा असलेल्या मुलींच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चासाठी धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल धनगर समाज जिल्हा धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे. या मोर्चासाठी आलेल्या वाहनाची पार्किंगची व्यवस्था लेडीज क्लब मैदान धाराशिव व मल्टीपर्पज हायस्कूल मैदान धाराशिव या ठिकाणी करण्यात आलेली आहे जवळपास 300 स्वयंसेवक हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
धाराशिव येथे धनगर समाज एस.टी.आरक्षण अंमलबजावणीसाठी मोर्चा
RELATED ARTICLES