निरा नरसिंहपुर
निरा व भिमा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे व गोर गरीब नागरिकांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झालेली पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाअध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, इंदापुर तहसीलदार सोनाली मेटकरी, पंचायत समिती बिडिओ विजय परिट, इंदापुर.पि.आय नारायण सारंगकर, कृषी अधिकारी रुपनवर, या सर्वांच्या उपस्थितीत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी निरा नरसिंहपूर येथे पुर परिस्थितीची पाहणी केली. नीरा व भीमा नदीकाठी पुराची पाहणी करुन निरा नरसिंहपुर परिसरामधील सर्व शेतकरी असो कामगार मजूर असो ज्यांच्या ज्यांच्या घरांमध्ये पुराचे पाणी गेलेले असेल व पाण्यामुळे अनेक प्रकारे नुस्कान झालेली असेल त्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश या वेळी पदाधिकाऱ्यांना व महसूल अधिकारी यांना दिले.
निरा नरसिंहपूर येथील सर्व पूरग्रस्त ग्रामस्थ व उपस्थित राहून प्रत्येकाने आपापल्या पुराच्या पाण्यामुळे झालेल्या या अडचणी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना यावेळी सांगितल्या यावेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे पुढे म्हणाले की पुराच्या पाण्याने अथवा पावसाने ज्या शेतकऱ्यांचे मोटारी पाईपलाईन अथवा शेतातील पिके घरातील सर्व काही पाण्याने वाहून गेली असतील त्यांचे तातडीने पंचनामे करण्यासाठी आदेश दिले यातून एकही शेतकरी पंचनामा करण्याचा न राहता कामा नये असे या वेळी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या