back to top
Monday, November 4, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याकवठे एकंद ता.तासगाव येथील थकीत शेतकऱ्यांना भूविकास बँकेच्या वन टाइम सेटलमेंट या...

कवठे एकंद ता.तासगाव येथील थकीत शेतकऱ्यांना भूविकास बँकेच्या वन टाइम सेटलमेंट या मागणीला महा विकास आघाडी सरकारकडून मुदतवाढ

सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा नंबर एक व दोन या संस्थेच्या संचालक मंडळ व सभासद यांच्या पाठपुराव्यास  यश

राहुल कांबळे/तासगाव प्रतिनिधी

कवठे एकंद ता. तासगाव येथील सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा क्रमांक एक व दोन या संस्थेचे काही थकीत शेतकरी बांधवांना वन टाइम सेटलमेंट चा लाभ झालेला नव्हता कारण याची मुदत सन २०१९ रोजी त्याची मुदत संपली असल्याने वन टाइम सेटलमेंट ची मुदत वाढ मिळावी यासाठी सदरच्या संस्थेचे चेअरमन,व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, वसभासद हे गेले वर्ष ते दीड वर्ष सतत पाठपुरावा करत होते. कवठे एकंद येथील काँग्रेस पक्षाच्या वतीने हे मंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे यासंदर्भात पत्रव्यवहार करून वन टाइम सेटलमेंट ची मागणी करण्यात आली होती.शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षांचे महाराष्ट्र मध्ये महा विकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन साधारणपणे दहा महिने पूर्ण झाले आहेत. सदरची मागणी पूर्ण व्हावी यासाठी तासगाव कवठेमंकाळ मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती सुमनताई आर आर पाटील यांच्याकडे संस्थेच्या वतीने पत्र देऊन सदरच्या या प्रकरणात लक्ष घालण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती. तसेच कृषी, सहकार राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या कवठेएकंद दौऱ्या दरम्यान पाणीपुरवठा संस्थेच्या वतीने पत्र देऊन या वन टाइम सेटलमेंट साठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. तर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना जयंतराव पाटील साहेब यांनी या प्रकरणात लक्ष घालून कवठे एकंद येथील सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठ्याच्या सभासद शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळवून दिला आहे.कवठेएकंद येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने दिलासादायक निर्णय शासनाच्या वतीने घेतला आहे. पालक मंत्री ना. जयंतरव पाटील  ना.डाॅ. विश्वजीत कदम व तालुक्याचे आमदार  सुमनताई आर आर पाटील यांना निवेदन देण्यात आल्याने त्याने या प्रकरणात लक्ष घातले होते.संस्थेच्या या मागणीला शासनाने प्रतिसाद देऊन ओटीएस योजना लागू केली त्याबद्दल मंत्रीमहोदय व आमदारांचे कवठे एकंद येथील सिद्धराज पाणीपुरवठा संस्थेचे सर्व संचालक मंडळ व सभासद यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे. सदरची बातमी दैनिक जनमत चे तासगाव तालुका प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी ही बातमी शेतकऱ्यांच्या दृष्टीने कशी योग्य आहे त्यासाठी लावून धरली आहे.यासाठी कवठे एकंद येथील शेतकरी बांधवांनी दैनिक जनमत चे आभार व्यक्त केले आहे. वन टाइम सेटलमेंट साठी मुदतवाढ मिळावी म्हणून सिद्धराज पाणीपुरवठा संस्था क्रमांक एक व दोन चे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ, चेअरमन डॉक्टर नरेंद्र खाडे, ज्येष्ठ नेते अशोक तात्या घाईल,रामभाऊ अण्णा थोरात, सूर्यकांत आप्पा पाटील, प्रवीण वठारे,बापू पाटील, अनिल पाटील, नागसेन कांबळे, अभिनंदन कोंगनोळे, प्रा विशाल चंदुरकर या सर्वांनी विशेष प्रयत्न केले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments