(रोसा – समीर ओव्हाळ)
परंडा तालुक्यातील रोसा या गावचे गेले दहा दिवसांपासून वीज गेलेली होती दैनिक जनमत हे 27ऑक्टोबर रोजी दैनिक जनमत ने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर झोपी गेलेली महावितरण कंपनी खडबडून जागी झाली आणि अवघ्या दोनच दिवसात गावातील वीज सुरळीत करून दिली. हेळसांड होऊन देखील गावातील नागरिकांनी महावितरण कंपनीचे आभार व्यक्त केले आहेत. गेल्या दहा दिवसापासून लाईट नसल्यामुळे गावात नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता
गेल्या १० दिवसापासून रोसा गावामध्ये विद्युत पुरवठा होत नसल्याने जन जिवन विस्कळीत झाले होते पाठपुरावा करून विद्युत पुरवठा चालू केल्या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो
-दिलीप ओव्हाळ ग्रामस्थ