कासार समाजातील अल्पवयीन मुलीचा नाहक बळी घेणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी

0
61

धाराशिव दि. १७ (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा येथील कासार समाजातील एका अल्पवयीन मुलीची एका नराधमाने छेडछाड करून तिचा नाहक बळी घेतला आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्ध पोस्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तर विशेष सरकारी वकील नेमून तो खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा. तसेच त्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री सोमवंशी क्षत्रिय कासार समाज उन्नती मंडळाच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी या मार्फत उपमुख्यमंत्र्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा  येथील कासार समाजातील एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करून नाहक बळी घेणाऱ्या आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच हा खटला विशेष सरकारी वकिल नेमून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. तसेच त्या मुलीचा गावातीलच एका गावगुंडाने मागील वर्षभरात अनेक वेळा छेडछाड करून दि.१२ जून रोजी नाहक बळी घेतला आहे.  मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात कासार समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून होणाऱ्या परिणामास कासार समाज जबाबदार राहणार नाही असा इशारा दिला आहे. या निवेदनावर अखिल भारतीय मध्यवर्ती मंडळाचे संचालक अरुण यादगिरे, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष गुलचंद व्यवहारे, जिल्हाध्यक्ष राजकुमार जगधने, युवक जिल्हाध्यक्ष महावीर कंदले, वैभव विभुते, शिरीष झरकर, वैभव कासार, चैतन मैंदर्गे, सतीश सातपुते, सावन देवगिरे, शार्दुल कासार, संतोष कपाळे, अमित जगधने, अजय शीलवंत, सुजित झरकर, एन.बी. झरकर, एस.एस. देवगिरे, प्रविण गडदे, सचिन झरकर, काकासाहेब कासार, सुधाकर शेट्टे, शिवम देवगिरे, मनोजचंद गडदे, शिवाजी कोळपे, सुरज देवगिरे, नितीन कोळपे, आदित्य जगधने, किरण कंदले आदींच्या सह्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here