तासगाव आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
तासगाव प्रतिनिधी
सांगली जिल्हा स्थलसीमेत जिल्हाधिकारी सो सांगली यांचे ब्रेक द चेन सी.आर.पी.सी. कलम१४४ अन्वये जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी आदेश पारित केले आहेत. सदर आदेश लागू असताना तासगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १५/४/२०२१ रोजी २०:०० वा नंतर
गोल्डवन नाष्टा सेंटर ,पाटील वाडा ढाबा,हॉटेल टर्निंग पॉईंट,साई यश ढाबा,हॉटेल जाई यांनी सदर आदेशाचे उल्लंघन केले प्रकरणी त्यांचेवर भा द वि कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच तासगाव पोलीस ठाणे हद्दीत करीत असताना शशिकांत तुकाराम शेंडगे वय ३० रा.पेड ता.तासगाव यांच्या ताब्यातील स्विफ्ट गाडी क्रमांक एम.एच.०९ २५३६ गाडीमध्ये देशी दारू बाळगताना मिळून आल्याने त्या चार व त्याचे साथीदार तुषार पांडुरंग शेंडगे रोहन सदाशिव गलांडे यांच्यावर मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून एकूण एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर दुसर्या घटनेत अधिनियम कलम ३७(१) (३) अन्वये बंदी आदेश लागू आहेत पोलीस ठाणे हद्दीत १६ रोजी तासगाव पोलिस गस्त घालीत असताना पेड हद्दीत एक संशयित इसम तुषार पांडुरंग शेंडगे वय २१ राहणार वरचे गल्ली तासगाव त्याच्याजवळ दोन बेकायदेशीर तलवारी मिळून आले असून सदर तलवारी जागेवर जप्त करून भारतीय हत्यार कायदा अधिनियम कलम४.२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*चौकट*
सध्या जिल्हाधिकारी सांगली यांच्या आदेशानुसार तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तासगाव शहर व तालुक्यामध्ये कडक कारवाई करण्यात येत असून, विनाकारण फिरणारे वाहन चालक विना मास्क घेणारे नागरिक यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तासगाव पोलिसांनी एक आक्रमक भूमिका घेतली आहे. ट्राफिक विभागाच्या सर्व कर्मचा-यांचे या बद्दल अभिनंदन कौतुक होत आहे परंतु तासगाव शहरातील अवैध धंद्या कडे सध्या पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे तासगाव शहरांमध्ये छुप्या पद्धतीने देशी दारू विक्री होत असून, मटका खुलेआम सुरू आहे.याचे केंद्रबिंदू तासगाव शहरातील सांगली नाका परिसर असून तासगाव पोलिस सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्या भागातील नागरिक करीत आहेत. नुकतेच पंधरा दिवसापूर्वी तासगाव पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. तासगाव शहरात सुरू असलेल्या सर्व अवैध धंद्यावर पोलीस निरीक्षक झाडे साहेब हे कारवाई करतील अशी अपेक्षा तासगावकर नागरिक व्यक्त करीत आहेत,परंतु या अवैध धंद्यांच्या व्यवसायावर कोणती कारवाई तासगाव पोलिसांच्या कडून होताना दिसत नाही ही तासगावकर नागरिक खंत व्यक्त करीत आहेत, परंतु पंधरा दिवस झाले अजूनही कोणत्या प्रकारची कारवाई खुलेआम मटका, दिवसा व रात्री राजरोस वाळू चोरी,जुगार, चोरून देशी दारूची विक्री शहरात परिसरात व तालुक्यात सुरू आहे. तरी उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी तातडीने आदेश देऊन या सर्व अनेक अवैध धंद्यावर कारवाई करावी अशी मागणी तासगावकर नागरिक करीत आहेत.