back to top
Sunday, September 15, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याकौडगाव औद्योगिक क्षेत्र विकासात खीळ घालणाऱ्यांना सदबुद्धि लाभो !

कौडगाव औद्योगिक क्षेत्र विकासात खीळ घालणाऱ्यांना सदबुद्धि लाभो !

 


आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे कौडगावचे ग्रामदैवत बजरंगबलीला महाआरती करून साकडे


 उस्मानाबाद

जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौडगाव येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आलीदोन टप्याचे भूसंपादन देखील पूर्ण झाले. 50 मे.वॅ. क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर होऊन कामही सुरू झाले. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या अनास्थेमुळे सदरील काम रेंगाळले असून टेक्निकल टेक्सटाईल हबचा प्रस्ताव देखील राज्य सरकारने प्रलंबित ठेवला आहे. जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठी व येथील अर्थकारणाला बळ देण्यासाठी या  औद्योगिक क्षेत्राचा विकास करून येथे मोठे प्रकल्प आणणे आवश्यक आहे. राज्याचे उद्योग मंत्री शिवसेनेचे जेष्ठ नेते आमदार सुभाष देसाई यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे वारंवार मागणी करूनही याबाबत बैठक बोलावली जात नाही अथवा निर्णय होत नाहीत्यामुळे या राज्यकर्त्यांना सदबुद्धि द्यावी यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांनी ग्रामदैवत हनुमानजींची महाआरती करून साकडे घातले.

 

यावेळी बोलताना आ.राणाजगजिसिंह पाटील साहेब म्हणाले कीतुमच्या सर्वांच्या साथीने कौडगाव एम आय डी सी मध्ये १५०० एकर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असून बार्शी तालुक्यातील १००० एकरचे भूसंपादन अंतिम टप्यात आहे. उच्चदाब वीज वाहिनीगॅस पाईपलाईनपाणी या पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. ही बाब तत्कालीन मुख्यमंत्री ना.  देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी येथील गरज लक्षात घेऊन आपल्या मागणीप्रमाणे या भागातील युवकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी टेक्निकल टेक्स्टाईल उभारण्यास मान्यता दिली व एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या. एमआयडीसीने केपीएमजी संस्थेच्या माध्यमातून प्रारूप आराखडा तयार करून राज्य सरकारकडे दाखल केलापरंतु सन २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या प्रस्तावावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. आजवर सदरील प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. उद्योगमंत्री नामदार सुभाषजी देसाई यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार केलाभेटून विनंती केलीअधिवेशनामध्ये सातत्याने हा विषय मांडला मात्र ना याबाबत बैठक बोलावली जातेना ही काही निर्णय घेतला जा तो. उद्योग मंत्री यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने माननीय मुख्यमंत्री ना.  उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे या विषयात लक्ष घालून बैठक बोलावण्याची मागणी केलीपरंतु दुर्दैवाने त्यांच्या कडूनही काही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यांच्यावर नुकतीच शस्रक्रिया झाली असून त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावीअशी देखील प्रार्थना यावेळी करण्यात आली.

 

तसेच या प्रसंगी ‍बोलताना नितीन काळे म्हणाले कीजिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौडगाव येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आली. ज्यामुळे या भागातील १०००० तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करत असताना जाणून बुजून धाराशिव जिल्हयाकडे दुर्लक्ष करणा-या महाविकास आघाडी सरकारमुळे हा प्रश्न प्रलंबीत असल्याचे त्यांनी सांगीतले.

जिल्ह्याच्या दृष्टीने टेक्निकल टेक्सटाईल हब हा विषय अत्यंत महत्वाच असल्याने तो मार्गी लावण्यासाठी बैठक बोलावण्याची सदबुध्दी राज्यकर्त्यांना द्यावी यासाठी आज ग्रामदैवत हनुमानजी यांना महाआरती करुन साकडे घातले. या विषयाबाबत येत्या १५ दिवसाच्या आत बैठक घेवून राज्य सरकारने  निर्णय घ्यावा अन्यथा मारुती रायाचे दुसरे नाव बलभीम आहे याची प्रचिती जनता देईल असा सज्जड इशारा याप्रसंगी देण्यात आला.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळेनेताजी पाटीलअँड. खंडेराव चौरेनितीन भोसलेअभय इंगळेराजसिंह राजेनिंबाळकरयुवराज नळेबालाजी सुतार,‍ माजी सरपंच  राजाभाऊ थोरात माजी उपसरपंच  नितीन थोरात, माजी पं. स. सदस्य चंद्रकांत थोरात, हनुमान मंदीराचे माजी  विश्वस्त भारत थोरात, राहुल काकडेप्रवीण पाठकपांडुरंग लाटेओम नाईकवाडीइंद्रजित देवकतेनाना घाटगेरोहित दंडनाईकसंतोष क्षिरसागरसुजित ओव्हाळलक्ष्मण मानेमेसा जानरावप्रीतम मुंडेप्रवीण शिरसाठेसागर दंडनाईकअमोल राजेनिंबाळकरगणेश एडकेगणेश इंगळगीमहेश बागलहिम्मत भोसलेस्वप्नील नाईकवाडीसंदीप इंगळेसुनील पंगूडवालेराज निकमसुरज शेरकरअमोल पेठेअनिल शिंदेबालाजी जाधवराजेसाहेब देशमुख, विश्वास नाईकवाडी, चंद्रकांत थोरात,  ज्ञानेश्वर थोरातगणेश जाधवसचिन चव्हाणकुमार तानवडे, भारत थोरात, ‍ विरसिग थोरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments