विम्यासाठी राष्ट्रवादी पुन्हा रस्त्यावर, येडशी येथे रास्ता रोको

0
61

 विमा कंपनीचे काम ईस्ट इंडिया कंपनीसारखे संजय पाटील दुधगावकर


उस्मानाबाद – शेतकर्‍यांना त्वरीत आणि सरसकट विमा मिळावा, या साठी राष्ट्रवादी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते त्याची दखल न घेतल्याने आज राष्ट्रवादीने बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनीविरोधात रस्ता रोको आंदोलन केले. सोलापूर- औरंगाबाद महामार्गावर असलेल्या येडशी येथे हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनीकडून करण्यात आले परंतू आजपर्यंत बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनीने शेतकर्‍यांना विमा मंजूर केलेला नाही. तसेच मागील वर्षाच्या विम्याची उर्वरित राहिलेली रक्कम अद्याप पर्यंत शेतकर्‍यांना दिलेली नाही.त्यासोबतच या वर्षी शेतकर्‍यांकडून विमा कंपनीच्या प्रतिनिधीने पैशाची मागणी केली आहे त्यामुळे सदर प्रतिनिधी विरुद्ध फौजदारी खटले दाखल करून बजाज इन्शुरन्स विमा कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी करत सरसकट हेक्टरी 20 हजार रुपयांची मागणी या आंदोलन मार्फत करण्यात आली राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले दरम्यान जर बजाज इन्शुरन्स कंपनीने ही मागणी मान्य केली नाही तर येत्या 5 डिसेंबर रोजी मुंबई येथील त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आंदोलन सुरू करण्यापूर्वी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आणि 26/11 मध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here