औद्योगिक न्यायालयाच्या निकालाने २१ महिलांना मिळाला न्याय

0
87

सेवेत कायम करण्याचे आदेश, नगरपालिकेने केला सत्कार


 उस्मानाबाद (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षापासून सेवेत कायम करावे या मागणीसाठी कामगार न्यायालयात लढा देणाऱ्या २१ महिलांना न्याय मिळाला आहे. सेवेत कायम करून घेण्याचे आदेश आल्याने सदर महिलांचा नगरपालिकेत नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,उपाध्यक्ष अभय इंगळे, शिक्षण सभापती सिद्धेश्वर कोळी, मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांनी एकत्रितपणे यथोचित सत्कार केला.

       नगरपरिषदेच्या बालवाडी सेविका या रोजंदारी कामगार म्हणून कार्यरत होत्या. या रोजंदारीवर असलेल्या बालवाडी सेविकांचा न्यायालयीन लढा त्यांच्या बाजूने लागला असून त्यांना आज रोजी नगरपरिषद उस्मानाबाद येथे रोजंदारी वरून कायम करण्यात आले. न्यायालयीन लढा जिंकणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व यापुढेही अशीच लहान बालकांची सेवा आपल्या हातून घडावी  अशी अपेक्षा व्यक्त करून आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना केली. व वर्षानुवर्ष लढणाऱ्या या महिलांना आता कायम सेवेत घेतल्याने त्यांना सेवेत शाश्वत आधार मिळाला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here