धनंजय सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान
परंडा,(भजनदास गुडे) : तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एकूण २६ शिक्षकांना तालुका शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती धनंजय सावंत व सभापती अनुजा दैन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शिक्षण विभाग,पंचायत समिती गटशिक्षण कार्यालय यांच्या वतीने हा सोहळा शनिवारी दि.१ जानेवारी रोजी पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती अनुजा दैन ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती धनंजय सावंत,प्रभारी गटविकास अधिकारी डॉ.अमित कदम, प्रभारी गटशिक्षण अधिकारी अशोक खुळे,विस्तार अधिकारी योगेद्र खराडे,अनिता जगदाळे, सतिश संगमनेरकर,दत्तात्रय निर्मळे,रमेश बारसकर,भागवत घोगरे,दत्तात्रय गरड,ज्ञानेश्वर देवराम,रामदास होरे,लहू मासाळ आदी मंचावर उपस्थित होते.सन २०१९-२० व २०२०-२१ मधील एकूण २६ पुरस्कार शिक्षकांना उपाध्यक्ष धनंज सावंत व सभापती अनुजा दैन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
त्यात प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक,विषय तज्ञ,मोबाईल टिचर, परिचर यांचा समावेश होता. सावात्रीबाई फुले व डॉ.राधाकृष्णण यांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन मान्य वारांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक प्रभारी गटशिक्षण अधिकारी अशोक खुळे यांनी केले.यावेळी बोलताना त म्हणाले,शिक्षण विभागाने तालुक्यातील अनेक राबविलेल्या शैक्षणिक उपक्रम,कोविड काळात शिक्षकांनी केलेल्या कामांचा आवर्जून उल्लेख केला.यावेळी सूत्रसंचालन अरविंद बाराते व मनिषा जगताप यांनी अत्यंत समर्पक शब्दात केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार नागनाथ गटकळ यांनी मानले.
यावेळी शिक्षक हजगुडे ,साबळे, शिक्षिका हेगडकर,श्रीमती सुषमा गोरे,डोके सर,कवडे सर,शिवाजी शिदे,जयदेव गंभीरे,राहूल अंधारे,हेमंत मस्के, नागनाथ देशमुख,वैनिनाथ सावंत, श्रीमती संजिवनी पाटील, श्रीमती राखीताई देशमुख,श्रीमती शांता ठाकुर,श्रीमती मनोरमा जाधव यांच्यासह शिक्षक,शिक्षीका व पुस्कारप्राप्त शिक्षकांचे कुटुंबीयण उपस्थीत होते.
चौकट…..यांना तालुकास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले….
पल्लवी चव्हाण परंडा,संगिता शिंदे डोमगाव, प्रभावती केमदारणे वाकडी,भारत केमदारणे वागेगव्हाण,माधुरी शिंदे आरणगाव,अंबॠषी कदम खासगाव,मनिषा कुलकर्णी शेळगाव,अंकुश गवळी गोसावीवाडी,लक्ष्मण काळे इनगोंदा,विशाखा तावरे सक्करवाडी,सुरेखा भोसले वाटेफळ,गिता शिंदे-पाटील परंडा, नागनाथ उकिरडे सोनारी,श्रीपाद दुधाळ पिंपळवाडी,परमेश्वर जगताप वडनेर,कल्याणी तांबे जवळा,मनोज कोळी राजुरी, महादेव गाडे तांदुळवाडी,सचिन माळीआलेश्वर,पांडुरंग साबळे आनाळा, गोकुळ कोकाटे देवगाव बु,उज्वला सोनवणे भांडगाव, सिध्देश्वर मेदने,वाटेफळ, विलास थोरात सोनारी,अंकुश डांगे व सारिका बेडके विषय साधनव्यक्ती,सुषमा माने परिचारिका यांचा तालुकास्तरीय पुरस्काऱ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.