परंडा (दि८ जानेवारी)प्रदेशाध्यक्ष शिवमती माधुरीताई भदाने यांच्या मार्गदर्शना खाली व प्रदेश कार्याध्यक्ष शिवमती नंदाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि.७ जानेवारी रोजी मराठा सेवा संघ कार्यालय उस्मानाबाद येथे उस्मानाबाद जिजाऊ ब्रिगेडची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.त्यामध्ये शिवमती सुजाता चव्हाण यांना विभागीय उपाध्यक्ष शिवमती रेखाताई सुर्यवंशी विभागीय प्रवक्त्या शिवमती आशाताई मोरजकर यांना उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष,तसेच शिवमती माधुरी गवारे यांना उस्मानाबाद शहर अध्यक्ष याप्रमाणे निवडी करण्यात आल्या आहेत.नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी रत्नमाला टेकाळे महिला व बालकल्याण सभापती,सुनंदा माधव माने उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष, उमरगा तालुका अध्यक्ष रेखा नंदकुमार पवार,लोहारा तालुका अध्यक्ष रंजनाताई श्रीकांत हासुरे, डॉ.तेजस्विनी प्रमोद करळे,भुम तालुका अध्यक्ष प्रगती तानाजी गाढवे,प्रमिला कमालकर शेळके, कल्पना रवी मोरे-पाटील,बालिका रवींद्र शिंदे,प्रगती अमोल खैरे, सुरेखा अनंत सुर्यवंशी,सीमा विजय पाटील, मनीषा राजेंद्र राजेनिंबाळकर,माधवी नंदकुमार गवारे,प्रतिभा विलासराव काकडे, अंजली दिनेश काकडे, सिमाताई काकडे,सुचीताताई काकडे,संध्या बाळकृष्ण शिंदे, प्रतिभाताई शिखंडी परसे आदी महिला उपस्थित होत्या.