अध्यक्षपदी महादेव वायकर तर उपाध्यक्ष पदी उत्रेश्र्वर बारस्कर यांची निवड
परंडा :- (दि ८ जानेवारी ) जि.प.प्रा शाळा,अंदोरी येथे कोरोनाचे सर्व नियम पाळत पालक सभेचे आयोजन करण्यात आले व शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली.
पालकसभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य शहाजी बारसकर तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे पोलीस पाटील अंगद बारसकर होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालक सभेला सुरूवात झाली.मुख्याध्यापक रमेश बारसकर सर यांनी प्रास्ताविक केले व आजच्या पालक सभेचा हेतू सांगितला.
यावेळी उपस्थित पालकांमधून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. सदर निवडीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध करण्यात आल्या.
व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्ष पदी महादेव वायकर तर उपाध्यक्ष म्हणून उत्रेश्वर बारसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तर सदस्य म्हणून गोकूळ बारसकर,श्रीहरी गायकवाड, रोहिणी गायकवाड,राधिका बारसकर,गौरी पवार व उर्मिला शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.शिक्षणतज्ज्ञ म्हणून भाऊसाहेब बारसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.नुतन अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्यासह सदस्यांचा सत्कार शाळेच्या वतीने रमेश बारस्कर सर यांच्या हस्ते करण्यात आला.सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशांत बरबडे यांनी केले.