सलगरा, दि.२१(प्रतिनिधी)
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे दि.२१ मार्च पासून अखंड शिवनाम सप्ताह सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. गेल्या १९ वर्षापासून सर्वाना समवेत घेऊन भक्तिमय वातावरणात यंदा सुद्धा हा सप्ताह सोहळा पार पडणार असून यामध्ये आज किलज येथील महादेव मंदिरात उपस्थित भजनी मंडळ, तसेच गावातील ग्रामस्थ व विविध पदांचे पदाधिकारी यांच्या समवेत महापूजा व परमरहस्य पारायण ग्रंथपूजन,विना,टाळ,मृदंग पूजन करीत विविध भक्तिमय भजन गीते गात या सप्ताह सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. तसेच परमरहस्य पारायण ग्रंथ वाचन करीत सुरुवात करण्यात आली. या सप्ताह सोहळ्या दरम्यान आठ दिवसांमध्ये दररोज परमरहस्य ग्रंथ वाचन,गाथा भजन,प्रवचन,शिवपाठ,विविध नामांकित कीर्तनकारांची कीर्तने, यांसह आनंदीमय,भक्तिमय वातावरणात हा सोहळा रंगणार आहे.सप्ताह सोहळा दरम्यान सर्व कीर्तने ही अभंग अमृत या यूट्यूब चॅनेल वर प्रसारित होणार आहेत, या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ सुद्धा उपस्थिती दर्शवत असतात. ग्रंथ वाचनाकरिता यंदा सुद्धा लहानग्या मुलांसमवेत महिलांचा देखील समावेश आहे. आठ दिवस आता किलज मध्ये भक्तिमय वातावरण असणार आहे, या सप्ताहाची सांगता ही महाप्रसादाने किलज येथील महादेव मंदिरात होणार आहे.