सलगरा – प्रतिक भोसले
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथे जागतिक जलदिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पिरॅमल फाउंडेशन, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, इनेबल हेल्थ सोसायटी (दिल्ली) यांच्या सी.एस.आर. फंडातून मंजूर शुध्द पिण्याचे पाणी प्रकल्प,२ लाख लिटर रेन वॉटर हार्वेस्टिंग, बोरवेल रिचार्ज, आणि शोष खड्डे आदी कामे सलगरा येथे करण्यात येणार आहेत म्हणून त्याच पार्श्वभूमीवर आज दि.२२ मार्च रोजी जागतिक जल दिनानिमित्त सलगरा येथे आरओ प्लांटचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मध्ये ३० पैसे प्रति लिटर या दराने स्कॅन केलेल्या कार्डद्वारे २० लीटर शुद्ध पाणी दिले जाणार असल्याची माहिती पिरॅमल फाउंडेशनचे मॅनेजर दिपक कळंदकर यांनी दिली.
या वेळी पिरॅमल फाउंडेशनचे मॅनेजर दिपक कळंदकर, प्रशांत पाटील, नितीन शिंदे, सरपंच विष्णू वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, जि.प. शाळेचे सुरेश वाघमोडे, व्हि.टी. कांबळे, बी.एच. सनगुंदे, श्रीमती. पवार व्हि.बी. प्रशांत मुळे, जीवन लोमटे, अनिल लोमटे, ज्ञानेश्वर बोधणे, गोरख मुळे, अनिल मुळे, नवनाथ बामणकर, राहुल बोधणे, दिलीप लोमटे, कुमार लोमटे, दिलीप मुळे, दस्तगीर मुलाणी यांच्या सह विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.