मुंबई – किरीट सोमय्यांनी टॉयलेट घोटाळा केला असून तो लवकरच बाहेर काढणार असल्याचे शिवसेना नेते यांनी सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे नवे आव्हान दिले आहे. आज किरीट सोमय्या मुंबई येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचा नवा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले आहेत तत्पूर्वीच संजय राऊत यांनी नव्या घोटाळ्याबाबत जाहीर करून सोमय्या यांच्या समोर नवे आव्हान उभे केले आहे. टॉयलेट घोटाळ्यात युवा प्रतिष्ठान आणि सोमय्या यांच्या पत्नी यांचा सहभाग असल्याचेही संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच हा घोटाळा १०० कोटींपेक्षा अधिक असल्याचेही ते म्हणाले.
आय एन विक्रांत घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या यांना अंतरिम जामीन मिळाला असला तरी या नव्या घोटाळ्यात नेमके काय समोर येते ते पाहावे लागेल.