उस्मानाबाद – जिग्नेश मेवानी यांच्या अटकेचा काँग्रेस ने निषेध केला असून जिल्हा काँग्रेस कमिटी उस्मानाबाद यांच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की गुजरात मधील वडगाम काँग्रेस पक्षाचे आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी गुजरात मधील पालनपुर सर्किट हाऊस येथून तीन दिवसापूर्वी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास बेकायदेशीरपणे अटक करून आमदार जिग्नेश मेवाणी यांना पोलिस कोठडीत पाठविण्यात आलेले आहे मा. पंतप्रधानांच्या नावाने एक ट्विट केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे समजते निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने देशाच्या पंतप्रधानांच्या नावाने काही उपेक्षा करणारे ट्विट हा अपराध नाही लोकशाही व संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. सरकारने मनमानीपणे सर्व नियम धाब्यावर बसवून यांच्यावर कारवाई केलेली आहे ही अटक बेकायदेशीर असून लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारे आहे आमदार जिग्नेश मेवाणी यांची त्वरित सुटका करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, अग्निवेश शिंदे, मधूकर तावडे, सिध्दार्थ बनसोडे, राजाभाऊ शेरखाने,रोहित पडवळ, विश्वजित शिंदे, हरिश्चंद्र शेळके,मेहराज शेख, धनंजय राऊत,आयुब पठाण,विनोद वीर, प्रशांत पाटील,शहाजी मुंडे,अशोक बनसोडे,प्रभाकर लोंढे,उमेशराजे निंबाळकर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
जिग्नेश मेवानी यांना अटक; काँग्रेसने केला निषेध
RELATED ARTICLES